- दोन रिक्षा व एक दुचाकी चोरीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात अज्ञात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पिंपरी व सांगवी परिसरातून दोन रिक्षा तर निगडीतून एक दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत बुधवारी (दि. ९) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माधुरी किशोर जाधव (वय २२, रा. खंडोबा माळ, आकुर्डी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची ७० हजार रुपये किमतीची रिक्षा (एम एच १४ / एच एम ०७१८) त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची रिक्षा चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. ७) पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. सुनील अल्बर्ट साठे (वय ६२, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचे मित्र सलीम जलाल सय्यद यांच्या नावावर असलेली ७० हजार रुपये किमतीची रिक्षा (एम एच १२ / एस के १८३९) फिर्यादी यांच्या घराजवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची रिक्षा चोरून नेली. हा प्रकार बुधवारी (दि. ९) मध्यरात्री दीड वाजता उघडकीस आला. राहुल मोजिल बिश्वास (वय १९, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची ३५ हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच १४ / एफ झेड ६५३७) अज्ञात चोरट्यांनी पंचतारानगर, आकुर्डी येथील एका किराणा दुकान समोरून चोरून नेली. हा प्रकार सहा जून रोजी सकाळी उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.