न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून. २०२१) :- भोसरी पांजरपोळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी धाड घातली. चक्क एटीएम मशीनच फोडल्याची घटना घडली आहे.
एटीएममध्ये किती रकम होती. त्यापैकी किती रकमेची चोरी झाली याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. आज गुरुवारी (दि. १०) रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेचा भोसरी पोलीस तपास करीत आहेत.