- अतिश बारणे यांचा विधायक उपक्रम; माजी आमदार विलास लांडे यांचे मार्गदर्शन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून. २०२१) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी मोशी परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, वृक्षारोपणासह वृक्ष वाटप केले.
मोशी परिसरातील आयोजित उपक्रमात माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, यांच्यासह जेष्ठ नगरसेवकांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी माजी नगरसेवक अरूण बोऱ्हाडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते मारूतीबाबा सस्ते, युवा नेते प्रकाश आल्हाट, युवा नेते नितीन सस्ते, युवा नेते उदय तापकीर, नवनाथ बारणे, सोमनाथ बारणे, अक्षय बारणे, अक्षय बोऱ्हाडे, सचिन बऱ्हाडे, आकाश बोऱ्हाडे, ओंकार आल्हाट , रोहित सुतार, ऋषिकेश गव्हाणे यांच्यासह आजूबाजूच्या सोसायटीतील सदस्य उपस्थित होते.
वृक्षारोपण उपक्रमाद्वारे परिसरात कडूनिंब, वड, चिंच, पिंपळ यासह वनऔषधी वृक्षांचे रोपण आणि वाटप करण्यात आले. पर्यावऱण संवर्धन कसे महत्त्वाचे आहे, याबाबत अतिश बारणे यांनी जनजागृती करून परिसरात संदेश दिला.
याबाबत अधिक माहिती देताना, शहर उपाध्यक्ष अतिश बारणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शहरभर विविध उपक्रम घेतले जात आहे. पक्षाची विचारधारा तळागाळातील लोकापर्यंत पोहचविण्याचे काम आपण विविध उपक्रमाच्या माध्यमातून करत आहोत. कोविड-१९च्या महामारीमुळे आपल्या सर्वांना पर्य़ावरणाचे महत्त्व कळले आहे. त्यासाठी पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती कऱण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.