- नंतर पार्सलच्या नावाखाली महिलेला सव्वा लाखाचा गंडा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून २०२१) :- लिंगायत मेट्रोमोनिअल साईटवरून एका अनोळखी व्यक्तीने मॅरेज रिक्वेस्ट पाठवली. फिर्यादी याांच्याशी लग्न करायचे आहे, असे आरोपीने सांगितले. त्याने फिर्यादी यांच्यासाठी विदेशातून पार्सल पाठवल्याचे सांगितले.
त्यानंतर दुसऱ्या आरोपीने फियार्दी यांना फोन करून मुख्य आरोपीने पाठवलेले पार्सल घेण्यासाठी आपण कस्टम विभाग दिल्ली येथून बोलत असल्याचे भासवून फियार्दी यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून एक लाख २५ हजार ५०० रुपये घेतले.
पैसे घेऊनही फिर्यादी यांना पार्सल मिळाले नाही. त्यामुळे फियार्दी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. ही घटना ४ ते १७ मे या दरम्यान उमांचल महिला हॉस्टेल आकुर्डी येथे ही घडली आहे. या घटनेबाबत तरुणीने गुरुवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. देव (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), हमजा खोतामिरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
















