- मालकाविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२१) :- कंपनीत प्रेस मशीनवर काम करताना कामगाराला दुखापत झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सप्टेंबर २०२० रोजी सकाळी पवारवस्ती कुदळवाडी चिखली येथे घडली आहे. या प्रकरणी सुनील उमा शर्मा (वय ३८, रा. पाटीलनगर, थेरगाव) यांनी चिखली पोलीस ठाण्यात १४ जून रोजी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी कंपनी मालक संजय बांदल, मॅनेजर विजय सेलगकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पवारवस्ती, कुदळवाडी येथील श्याम इंडस्ट्रीमध्ये काम करतात.
५ सप्टेंबर २०२० ला फिर्यादी कंपनीमध्ये प्रेस मशीनवर जॉब तयार करण्याचे काम करत होते. सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कंपनीचे मालक संजय बांदल आणि मॅनेजर विजय यांनी फिर्यादींना प्रेस मशीनचे कोणतेही प्रशिक्षण न देता व कोणतीही सेफ्टी साधने न देता काम करावयास पाठवले.
















