- शहरातील बिर्लासह १४ खासगी रुग्णालयांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जून. २०२१) :- करोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या शहरातील १४ खासगी रुग्णालयांना नोटीस दिल्या आहेत. पंधरा दिवसात वाढीव बिलांचे परतावे करण्याचे आदेश महापालिकेने या रुग्णालयांना दिले आहेत.
तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बिलांचे परीक्षण करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या पथकाने प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन बिलांचे लेखापरीक्षण केले. बिलांची तपासणी केली. दुसऱ्या लाटेत १४ रुग्णालयांनी वाढीव बिले दिल्याचे आढळून आले.
शहरातील श्री गजानन हॉस्पिटल, एकॉर्ड हॉस्पिटल, पूजा हॉस्पिटल बिरासाहेब रुपनर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, जीवनज्योती हॉस्पिटल, ओजस हॉस्पिटल, भोसरी, अपेक्षा हॉस्पिटल, मंकीकर हॉस्पिटल, जीवन हॉस्पिटल, जयहिंद हॉस्पिटल, बिर्ला रुग्णालय, वायटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, स्पदन हॉस्पिटल डांगे चौक आणि आर्या हॉस्पिटल या रुग्णालयांना महापालिकेने नोटीस बजावली आहे.
















