- चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२१) :- चिखली प्राधिकरण येथे सेक्टर क्रमांक ११ मध्ये रत्नाकर बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्याने तोडून त्याचे नुकसान केले. एटीएमच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला.
सोमवारी रात्री पावणे अकरा ते मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्या कालावधीत ही घटना घडली. मशीन मधून पैसे चोरण्याचा प्रयत्नही केला. अजय लक्ष्मण कुरणे (वय ३९, रा. कळस माळवाडी आळंदी रोड, पुणे) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.


















