- भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२१) :- विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३१ हजार ५०० रुपये किमतीचे एक पिस्तूल मॅक्झीनसह व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
भोसरी येथे गुळवे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शशिकांत हनुमंत बॅगरी (वय २२, रा. आनंद नगर झोपडपट्टी, चिंचवड), असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी सुमित देवकर यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


















