- जीवे मारण्याची धमकी; निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२१) :- व्यावसायिकाला त्यांच्या फेसबुक आणि व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अश्लील मेसेज केले. तसेच बदनामी करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ५ ते ६ जून या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडली.
अमित मधुकर मेश्राम (वय ३६, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याबाबत बुधवारी (दि. २३) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन गजधने उर्फ जंगली (रा. अक्कलकोट, जि. सोलापूर) या आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम २९४, ५०१, ५०६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०१० कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.