- निगडी, भोसरी, आळंदी परिसरात लाखांचा गांजा जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२१) :- निगडी, भोसरी, आळंदी येथे पोलिसांनी धाड टाकीत एक लाख ११ हजार १०० रुपये किमतीचा दोन किलोपेक्षा अधिकचा गांजा पकडला. बेकायदेशीररित्या एक किलो २९८.५ ग्रॅम वजनाचा ३५ हजार ७५० रुपये किमतीचा गांजा जवळ बाळगणा-या इसमास आकुर्डीतील विठ्ठलवाडी येथे निगडी पोलिसांनी अटक केली. निलेश नंदेश्वर चव्हाण (वय ३५, रा. नवीन तरटे चाळ, विठ्ठलवाडी, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओटास्कीम निगडी येथे कारवाई करून पाच हजार ५५० रुपयांचा २२२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. अहमद रजा वाशीउज्जमा खान (वय ३४, रा. निघोजे, ता. खेड. मूळ रा. उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील गोलेगाव येथे छापा मारून एका ६२ वर्षीय व्यक्तीला अटक केली. दिगंबर रघुनाथ चौधरी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी कडून ४८ हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरीतील मुस्लीम शाही कब्रस्तान गेट समोर २१ हजार ८०० रुपये किमतीचा ८८२ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. राजेभाऊ शेषराव खंडागळे (वय ५२ रा. भोसरी ब्रिज खाली. मूळ रा. मालीपारगाव, ता. माजलगाव, जि. बिड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.