- पिंपळे निलखमधील घटना; सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जून. २०२१) :- पिंपळे निलख येथे स्व मिळकतीवर बांधकामासाठी आवश्यक लाईन आऊट करण्यासाठी फिर्यादी हे कामगार आणि ठेकेदार यांना घेऊन त्यांच्या जागेत गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ, धमकी देऊन त्यांचे चालू असलेले काम बंद पाडले. तसेच फिर्यादी यांनी त्यांच्या जागेला केलेले कंपाऊंड, लोखंडी पोल, लोखंडी पाण्याची टाकी, तसेच बिल्डिंग कामासाठी आवश्यक असलेले साहित्य वॉचमनला दमदाटी, शिवीगाळ, मारहाण करून ४८ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले.
पुन्हा या जागेत आला तर तुला जीवे ठार मारू. इथे परत आला तर दहा वेळा फायरिंग करील. अशी धमकी देऊन फिर्यादी यांना जागेत काम करण्यापासून रोखले. ही घटना १७ जानेवारी २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.
अजिंक्य विठ्ठल काळभोर वय ४५, रा. तुळजाई वस्ती, आकुर्डी यांनी गुरुवारी दि. २४ सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नानासाहेब गायकवाड रा. औंध, केदार उर्फ गणेश गायकवाड रा. औंध, गणेश साठे, राजा पुर्ण नाव पत्ता माहीती नाही आणि अन्य दोन ते तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
















