- बैठकीत लार्सन अॅण्ड टुब्रो व टेक महिंद्रासह इतर कंपन्यांच्या कामांना मुदतवाढ..
- भविष्यात रोजगारभिमुख शहर बनविण्याकडे कल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची चौदावी बैठक शुक्रवारी (दि. २५) चिंचवड, ऑटो क्लस्टर येथील पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती.
या बैठकीसाठी अध्यक्ष नितिन करीर, चेअरमन तथा प्रधान सचिव, महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, प्रमोद कुटे, सचिन चिखले, केंद्र शासनाच्या प्रतिनिधी ममता बात्रा, राजेंद्र जगताप, मुख्य व्यवस्थापकीय संचालक PMPML, कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त, राजेश पाटील आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिचवड स्मार्ट सिटी लिमिटेड हे सर्व संचालक सभेस उपस्थित होते. याव्यतिरीक्त सह मुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील व निळकंठ पोमण, मुख्य वित्तिय अधिकारी सुनिल भोसले, अशोक भालकर, जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रकचर, मनोज सेठीया, कार्यकारी अभियंता सभेस उपस्थित होते.
बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर एकुण ३० विषय होते. यात पॅन सिटी प्रकल्पातंर्गत काम करणारे मे. Larsen & Toubro Limited आणि मे. Tech Mahindra Limited यांना कोविड -१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाकडील शासन निर्णयानुसार प्रकल्प कामासाठी सहा महिने दंडासह मुदतवाढ देणेकामी संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध स्मार्ट ऐलिमेंन्टस कार्यान्वित करणेकामी Optical Fiber Cable टाकण्याची कार्यवाही चालू असून फायबर केबलब्दारे भविष्यामध्ये उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणार आहे. त्याकामी Fiber Network Monetization & Operations Committee स्थापन करणेत आलेली असून या विषयास मान्यता दिलेली आहे.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या म्युनिसिपल ई – क्लासरुम प्रकल्पातंर्गत १०५ शाळांमध्ये बसविण्यात आलेले IT Equipment’s चे सिटी नेटर्वकच्या सहाय्याने ICcc येथे संयुक्तपणे इंटीग्रेशन करणार आहे. जेणेकरुन या शाळांना Digital Platform प्राप्त होणार आहे. त्यासाठी एकुण र.रु .५.६४ खर्च होणार असून संचालक मंडळाने या विषयास मंजुरी दिलेली आहे.
संचालक मंडळाने एबीडी प्रकल्पातंर्गत काम करणारे प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट मे. KPMG Advisory Service Pvt Ltd यांना प्रकल्प कामगिरीच्या आधारावर एक वर्ष मुदतवाढ देणेकामी मान्यता दिलेली आहे.
म्युनिसिपल ई – क्लासरुम प्रकल्पाचे सिस्टीम इंटीग्रेटर यांना कोवीड -१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या प्रकल्प कामासाठी तीन महिने दंडासहित मुदतवाढ देणेकामी संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी चे Skill Development प्रकल्पातंर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे Smart Training & Innovation Center ( STIC ) यांचेबरोबर सामंजस्य झालेला असून या करारामुळे पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील उदयोन्मुख उद्योजकांना मार्गदर्शक ठरणार आहे व परिणामी उद्योग वाढण्यास मदत होणार आहे.
याद्वारे तरुणांना सक्षम व तरुण नागरिक सक्षम करणे, शहरातील तरुण नागरिकांना नोकरीभिमुख प्रशिक्षण देऊन रोजगार वाढीस सक्षम करने. शहरातून भविष्यात औद्योगिक क्रांतीसाठी मनुष्यबळ तयार करुन औद्योगिक अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणे. आत्मानिर्भर भारत यांचे योगदान: लोकसांख्यिकीय लाभांश त्यांना नवीन कौशल्ये प्रशिक्षण देऊन अधिक फायदा मिळवून देणे, अर्थव्यवस्था व नागरिकांना पाठबळ देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने पुढाकार घेऊन क्षमता वाढवण्याचा उपक्रम घेणे. महिला सहभाग सुनिश्चित करणे: युवतींसाठी समर्पित व पुरस्कृत बॅच चालवून टेक जॉबमधील लैंगिक समतेवर विशेष भर देणे. तरुण नागरिकांसाठी जागतिक संधी निर्माण करणे. आगाऊ प्रशिक्षण देऊन वैश्विक रोजगाराच्या संधी असलेल्या उमेदवारांना आधार मिळवून देणे.
भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयातर्फे सुरु करणेत आलेल्या India Cyclesa change योजनेमध्ये पिपरी चिंचवड शहाराचा समावेश झालेला असून ही योजना राबविणेकरीता बीआरटीएस व स्मार्ट सिटी यांच्या योग्य समन्वयाने योजनेची अंमलबजावणी करणेत येणार आहे. तसेच Non – Motorized Transporn Challenge करीता NMT ExpervCycling Expert आशिक जैन यांची एक वर्ष कालावधीकरीता या कामासाठी नियुक्त करणेच्या विषयास संचालक मंडळाने मंजुरी दिलेली आहे.
















