न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जून. २०२१) :- रावण साम्राज्य टोळीच्या नावाचा वापर करून दहशत पसरविणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्वप्नील उर्फ युवराज सुरेश गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही कारवाई गुंडा विरोधी पथकाने केली आहे. आरोपीने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हातात कोयता घेऊन फोटो पोस्ट केला होता. त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अक्षरशः स्वतः ला भाई म्हणावणाऱ्या स्वप्नीलला अखेर हात जोडावे लागले आहेत.
















