- परदेशी जाणाऱ्या व्यक्तींनादेखील उद्या मिळणार कोविशिल्ड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या शनिवारी (दि. २६) रोजी ‘ कोविशिल्ड ’ चा डोस १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील फक्त पहिला डोस हा कोविन अॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या १० टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा-या ९० टक्के लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, संजय काळे सभागृह, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, रोटरी क्लब सेंटर, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, घरकुल दवाखाना चिखली, कन्या शाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, तळवडे समाज मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल फुलेनगर, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, नेहरुनगर उर्दु शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, एसएस अजमेरा स्कुल, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, आदिशक्ती हॉस्पिटल भोसरी, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, सखुबाई गार्डन भोसरी,सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी,कासारवाडी दवाखाना, निळु फुले नाट्यगृह सांगवी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले शाळा, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, भाटनगर दवाखाना, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, नताशा आय क्लिनीक पिंपळेसौदागर, काकाज इंटरनॅशनल स्कुल तपकिर मळा, काळेवाडी, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, जुने तालेरा रुग्णालय, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या ४४ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत ४००, ३००, २००, १००, व ५० लाभार्थ्यांच्या क्षमतेने हा डोस मिळेल.
तसेच उद्या वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना व एचसीडब्ल्यू/एफएलडब्ल्यू यांना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने हेडगेवार जलतरण तलाव, आरटीटीसी सेंटर, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, महापालिका शाळा खराळवाडी, दीनदयाळ शाळा पिंपरी, क्वालिटी सर्कल भोसरी, गंगोत्री पार्क दिघी, नवीन भोसरी रुग्णालय, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, महापालिका शाळा वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, महापालिका शाळा रहाटणी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, अश्विनी मेडिकल फाउंडेशन आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या २१ लसीकरण केंद्रावर २००, ३००, १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर उद्या शनिवारी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील तसेच कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी आज रात्री ८.०० नंतर स्लॉटबुकींग करण्यासाठी ओपन करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर उद्या सकाळी ८.०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.
पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation letter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.), मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा-या नागरीकांना ऑफर पत्र तसेच टोकिओ ऑलंपिकमध्ये भाग घेण्यासाठी नामांकन याबाबतचे पत्र असलेले खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना या कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवार दि. २६ जून २०२१ रोजी नविन जिजामाता रुग्णालय या लसीकरण केंद्रावर ‘कोविशिल्ड’चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी १० ते सायं ०५ या वेळेत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येणार आहे.
















