न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ क ‘ क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाने प्रभाग क्र. ८ मधील गवळीमाथा येथील अनुकुल चौक या रस्त्यावरील १४ अनधिकृत टप-या व पत्राशेड निष्कासित करण्याची कारवाई केली.
शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासित करण्याच्या सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व क्षेत्रिय अधिकारी व अतिक्रमण पथकाच्या झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार क क्षेत्रिय कार्यालयाचे सहा.आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिकारी नाना मोरे व भोसरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक प्रदिप पाटील, पोलिस निरिक्षक जाधव, सहा. पोलिस निरिक्षक घिघे, व सहा. पोलिस निरिक्षक रत्नपारखी यांच्या पथकाने ही अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई केली.
या पथकामध्ये क क्षेत्रिय कार्यालय व इ क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण पथकाचे अतिक्रमण निरिक्षक बाळासाहेब कार्ले, अतिक्रमण निरिक्षक काळे एल.एम. व बीट निरिक्षक शिरसाट एस.डी यांच्यासह १० अतिक्रमण मजूर,२० पोलिस कर्मचारी,१५ होमगार्ड व ०२ जेसीबी , इतर यंत्रसामुग्रीच्या मदतीने ही अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली.
















