- कारवाईतून अडीच महिन्यात १ कोटी ९ लाख रुपयांचे घसघशीत उत्पन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. जून. २०२१) :- अडीच महिन्याच्या कालावधीत शहरातील नागरिकांनी करोनाच्या नियमांचे पालन न करता महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी ९ लाख रुपये दंडाच्या स्वरुपात जमा केले. त्यामध्ये सर्वाधिक एक कोटी ४७ लाख रुपये इतका दंड मास्क न वापरण्याकडून वसूल करण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाकडून दंडाची कारवाई केली जात आहे. शहरात १ एप्रिलपासून ते २२ जून या कालावधीत करोनाचे नियमभंग करणाऱ्या ३० हजार ९४० जणांकडून १ कोटी ६९ लाख ८५ हजार ५०९ रुपयांचा एकूण दंड वसूल केला आहे. त्यामध्ये मास्क न लावता फिरणाऱ्या २९ हजार ५०६ नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.
रस्त्यावर धुंकणाऱ्या नागरिकांना महापालिकेने प्रत्येकी १ हजार रुपये इतका दंड लावला. त्यातून ६ लाख ६ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळणाऱ्या ७४५ नागरिकांकडून १५ लाख ८५ हजार रुपये इतका दंड वसुल केला आहे. तर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या ८३ नागरिकांकडून ४१ हजार ५०० रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.
















