- पिंपरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. जून. २०२१) :- ‘मला तू आवडते, माझ्या सोबत बोलत जा, मी तुझ्यासाठी झुरत आहे’ असे म्हणून दीड वर्षापासून महिलेचा पाठलाग करणाऱ्या रोमिओला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरीतील डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये गुरुवारी (दि. २५) हा प्रकार घडला.
नितीन बाबुराव थिटे (वय २८, रा. केंदुर, शिरूर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील दीड वर्षापासून फिर्यादी महिलेचा पाठलाग करत आहे. महिला पिंपरीतील डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये भेटल्यावर ‘मला तू आवडते, माझ्या सोबत बोलत जा, मी तुझ्यासाठी झुरत आहे’ असे वारंवार म्हणून तिचा विनयभंग केला असे फिर्यादीत म्हटले आहे. दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी या रोमिओला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पीटी चाटे अधिक तपास करत आहेत.
















