- रविवारी ‘ कोविशिल्ड ’ व ‘ कोव्हॉक्सीन ’ चा लाभार्थाना डोस..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या रविवारी (दि. २७) रोजी ‘ कोविशिल्ड ’ चा डोस १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील फक्त पहिला डोस हा कोविन अॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या १० टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा-या ९० टक्के लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
हा डोस कै. ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, नुतन शाळा ताम्हाणेवस्ती, रुपीनगर, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना या ८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत ३०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
तसेच उद्या ‘कोव्हॉक्सीन’ वय ४५ वर्षा पुढील फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येईल.
उद्या ‘कोव्हॉक्सीन’ वय १८ ते ४४ वर्षे फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय, पिं. चिं. मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येईल.
दरम्यान वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आर.टी.टी.सी. सेंटर, यमुनानगर रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड, सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिं. निलख दवाखान्याजवळ या आठ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत ३०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर उद्या रविवारी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील तसेच कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी आज रात्री ८.०० नंतर स्लॉटबुकींग करण्यासाठी ओपन करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर उद्या सकाळी ८.०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.
















