- शहरातील लसीकरण केंद्रांच्या ठिकाणांसाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या सोमवारी (दि. २८) रोजी ‘ कोविशिल्ड ’ चा डोस १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील फक्त पहिला डोस हा कोविन अॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या १० टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा-या ९० टक्के लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
हा डोस कै. ह. भ. प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, इ.एस.आय.एस हॉस्पीटल, मोहननगर, चिंचवड, यमुनानगर रुग्णालय, प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, कासारवाडी दवाखाना, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ, अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन, प्रेमलोक पार्क दवाखाना या १६ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत २०० व ३०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
तसेच उद्या ‘कोव्हॉक्सीन’ वय १८ वर्षापुढील फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत २०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येईल.
दरम्यान वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) आर.टी.टी.सीसेंटर संजय काळे सभागृह रोटरी क्लब सेंटर संभाजीनगर घरकुल दवाखाना चिखली साई अमब्रेला संभाजीनगर दवाखाना पिं.चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली पिं.चिं. मनपा. शाळा जाधववाडी रुपीनगरशाळा स्केटिंग ग्राउंड सेंक्टर नं २१ यमुनानगर तळवडे समाज मंदीर शाळा स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क, फुलेनगर पिं.चिं. मनपा. शाळा, खराळवाडी दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी नेहरुनगर उर्दु स्कुल एस.एस.अजमेरास्कुल, अजमेरा क्वालिटीसर्कल, भोसरी गंगोञी पार्क, दिघी नवीन भोसरी रुग्णालय संत ज्ञानेश्वरक्रीडा संकुल , इंद्रयनी नगर , भोसरी आदिशक्ती हॉस्पीटल, भोसरी पिं.चिं. मनपा. शाळा बोपखेल सखुबाईगार्डन, भोसरी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम) पंडितजवाहरलाल नेहरु शाळा, च-होली गणेश इंग्लिश स्कुल, दापोडी शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी पिंपळे गुरव माध्यमीक शाळा निळुफुले नाटयगृह, सांगवी पि.चि. मनपा शाळा, वाकड पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकड कांतीलालखिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३ पिं.चिं. मनपा. शाळा राहटणी भाटनगर दवाखाना पिंपरी पिं.चिं. मनपा. शाळा ,पवनानगर, काळेवाडी नताशा आय क्लिनिक, पिंपळे सौदागर काकाज इंटरनॅशनल स्कुल, तापकिर मळा, काळेवाडी मनपाशाळा किवळे बिजलीनगर दवाखाना बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे अश्विनी मेडीकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे मानसरोवर गुरुव्दारा, वाल्हेकरवाडी कामत हॉस्पीटल पिंपरी नर्सिंग स्कुल, चिंचवड सेक्टर नं.२९, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ,पुनावळे मनपाशाळा, वाल्हेकरवाडी या ५० लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० व २०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर उद्या सोमवारी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील तसेच कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी आज रात्री ८.०० नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर उद्या सकाळी ८.०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.
















