- अज्ञात चोरट्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जून. २०२१) :- अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख ९९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. २४) दुपारी पिंपरीगाव येथे घडली.
केतन अशोक नांगरे (वय ३३, रा. गुरुदत्त हौसिंग सोसायटी, तपोवन मंदिराजवळ, पिंपरीगाव) यांनी शनिवारी (दि. २६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















