- मोशीतील घटना; चालकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२१) :- मोशी येथे बसमधून उतरत असताना एसटी बस चालकाने ‘स्टॉप आला आहे, लवकर खाली उतरा’, असे म्हणू घाई केली. एकजण बसमधून खाली उतरत असताना आरोपीने बस पुन्हा पुढे नेऊन गाडीला झटका दिला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली.
त्यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ही घटना मोशीतील जकात नाका चौक, येथे रविवारी (दि. २७) पहाटे घडली. भगवानदास बॉर्डर यादव (वय ५१, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे मृत्यु झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांचा मुलगा ओमप्रकाश भगवानदास यादव (वय २१) यांनी रविवारी (दि. २७) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश मधुकर साबळे (रा. लोणीकंद, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















