- पथविक्रेत्यांना ताबडतोब योग्य जागी स्थलांतरित करा; महापौरांची सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात महापौर माई ढोरे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक ३२ मधील विविध समस्या व कोरोना विषयावर बैठक संपन्न झाली.
यावेळी ‘ह’ प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसेविका शारद सोनावणे, नगरसेवक संतोष कांबळे, प्रभाग अधिकारी हराळे आदी उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाले, पथविक्रेते, भाजी विक्रेते यांनी सांगवीतील मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण जागेत आपले स्टॉल उभारले आहेत. त्याचा नाहक त्रास वाहतुकीस होत आहे. पथविक्रेत्यांना ताबडतोब योग्य जागी स्थलांतरित करावे. त्यामुळे वाहतुकीस व रहदारीस त्रास होणार नाही. प्रभागात दोन मोठे लसीकरण केंद्रे उभारावीत. ज्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही. लसीकरणचा वेग वाढेल, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. सर्व पथविक्रेत्यांना लसीकरणासाठी जागरूक करावे. नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशा सूचनाही महापौरांनी यावेळी केल्या.