न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२१) :- कोरोना काळात जोखीम पत्करुन कोरोना बाधितांवर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त करण्याची डॉक्टरांची कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहीण्यासारखी आहे असे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी केले.
डॉक्टर डे निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर माई ढोरे यांनी शहरातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्या बोलत होत्या.
महापौर माई ढोरे म्हणाल्या गेले दीड वर्ष शहरवासियांना कोरोना विषाणूंचा सामना करावा लागत आहे. मात्र तो करीत असताना शहरातील डॉक्टर्सकडून जोखीम पत्कारुन जबाबदारीने व आत्मियतेने रुग्णसेवेचे काम प्रामाणिकपणे पार पाडले ते यापुढेही सदोदित करीत राहून जनसेवा करावी असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.