- ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थान दिनीच आळंदीत घबराट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०२१) :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुका आज (दि. २) निमंत्रित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान ठेवणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी निमंत्रित २०४ वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. या चाचणीत आळंदीच्या नगराध्यक्षांसह तब्बल २२ वारकऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आळंदी देवस्थान व आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून प्रस्थान सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या वारकरी, मानकरी, टाळकरी, गावकरी आदींची दोन दिवस कोविड – १९ ची चाचणी करण्यात आली आहे.
कोविड चाचणी नंतर संबंधित वारकऱ्यांना लगतच्या फ्रुटवाले धर्मशाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान संबंधित वारकऱ्यांच्या चाचणीचे अहवाल आल्यानंतर एकूण २२ सहभागी होणारे वारकरी, आळंदीच्या नगराध्यक्षा तसेच मंदिरातील कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.