- पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०२१) :- लोणावळ्याच्या कुसगाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा त्याच्या मित्रासह खाणीत बुडून मृत्यू झाला आहे. आकाश गुरव आणि धिरेंद्र त्रिपाठी अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
आकाश गुरवचा मागील आठवड्यात वाढदिवस झाला होता. त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी आकाश त्याच्या मित्रांसह लोणावळा परिसरात फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान, आकाश आणि धिरेंद्र हे दोघे ही खाणीत पोहण्यासाठी उतरले तेव्हा, त्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने पोहत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला.
ही घटना गुरुवार रोजी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. तर, शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.