- निगडी प्राधिकरणात ‘डॉक्टर डे’ निमित्त डॉक्टरांचा सत्कार….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०२१) :- ‘डॉक्टर डे’ निमित्त अनुप मोरे युवा मंचच्या वतीने निगडी प्राधिकरणात छोटेखानी कार्यक्रमात शहरातील डॉक्टर्सना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच काही मान्यवर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, सलीम शिकलगार, आर. एस. कुमार, मान्यवर डॉक्टर, मनोज देशमुख, नरेंद्र यलकर, प्रसेन अष्टेकर आदी उपस्थित होते.
कोरोना काळात डॉक्टर देव बनून अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मृत्यूच्या दाढेतून अनेकांना त्यांनी बाहेर काढले. यामुळे डॉक्टर हे खरे कोरोना योद्धा आहेत. सर्वानीच मोठ्या हिमतीने लढा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार मानावेत अशीच त्यांची कामगिरी आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. इतकंच नाही तर सर्वांनी त्यांना धन्यवाद देऊन दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना ईश्वराजवळ करावी, असे मत माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे यांनी गुरुवारी (दि. १) डॉक्टर दिनानिमित्त व्यक्त केले.