- संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२१) :- शहरातील घर कामगारांचे करोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी क्रांतिकारी घरकामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने पाटील यांची नुकतीच भेट घेतली. घरकामगारांचे लवकरच लसीकरण करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी संबंधितांना दिले.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेरी यांच्यासह उपाध्यक्ष गोकुळ बंगाळ, लता पवार यांनी आयुक्तांची भेट घेतली. तसेच, त्यांच्याकडे घर कामगारांचे लसीकरण करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी महिला वैद्यकीय अधिकारी वर्षा डांगे यांचीही भेट घेतली.
संघटनेच्या सभासदांच्या लसीकरणाची लवकरच सोय करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. त्यानुसार त्यांना प्रथम ‘ अ ‘ प्रभाग अंतर्गत येणाऱ्या आकुर्डी, निगडी, प्राधिकरण परिसरातील सभासदांची यादी दोन दिवसांत देण्यात येणार आहे. यादीत नाव असलेल्यांना लस देण्यात येणार आहे.