न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२१) :- मराठी चित्रपट व टीव्ही दिग्दर्शक राजू सापते यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. राकेश मोरीया हा काम करु देत नाही. त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सापते यांनी चित्रित केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.
‘मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. राकेश मोरीया मला खूप त्रास देत आहेत. माझं कोणत्याही प्रकारचे पेमेंट थकीत नाही. राकेश मोरीया लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून वदवून घेत आहेत की राजू सापतेनी ‘एक का देड दिया नही’. मी सगळं पेमेंट क्लिअर केलं आहे. तरीही राकेश मोरीया मला खूप त्रास देत आहे. कोणतंही काम सुरू करु देत नाहीत, सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत. मला ‘झी’च काम सोडून द्यावं लागलं, तसेच दक्षमी क्रिएशन्सचे काम सुरू असताना त्यांनी ते बंद पाडले. त्यामुळे या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे. तरी मला न्याय मिळावा.’ असे राजू सापते यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

















