- वाल्हेकरवाडीतील मठाधिपतीनेच काढला काटा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२१) :- ‘पुण्यातील कात्रज घाटात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा मृतदेह आकुर्डीतील आनंद गुजर (वय ४३) नामक व्यक्तीचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. अनैतिक संबधांतून वाल्हेकरवाडी येथील मठाधिपती महाराजानेच आकुडीर्तील या व्यावसायिकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे.
याप्रकरणी मठाधिपती रमेश विलास कुंभार (वय ४९, रा. गुरुदेवनगर, आकुर्डी, सध्या रा. गोरखनाथ मंदिराजवळ, वाल्हेकरवाडी), सरोज आनंद गुजर (वय ४०, रा. चिखली, मुळ गाव खारघर, ता. पनवेल), यश योगेश निकम (वय १९, रा. वाल्हेकरवाडी, शिवगोरक्षनाथ मठ, निगडी), अमोल रामदास बडदम (रा. शिवगोरक्षनाथ मठ, निगडी, वाल्हेकरवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी त्यांचा भाऊ सुनिल गुलाब गुजर (वय ३६, रा. खटाव, जि़. सातारा) यांनी फिर्याद दिली. रमेश कुंभार व त्याच्या साथीदारांनी आनंद गुजर यांचा अनैतिक संबंध व प्रॉपटीचे वादातून खुन केल्याची तक्रार केली. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह कात्रज घाटात टाकून अपघाताचा बनाव केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करुन महाराजाचा कट उघडकीस आणला आहे.