- तरुणाने लग्नाआधीच ठेवले तरुणीशी शारीरिक संबंध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- तरुणीबरोबर साखरपुडा झाल्यानंतर तरुणाने तरुणीच्या रूमवर जाऊन तिच्याशी जवळीक साधली. आपण आता नवरा बायको होणार आहे, असे सांगत तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर या तरुणाने लग्नास टाळाटाळ केली.
तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठून होणाऱ्या नव-याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला. तसेच मुलाच्या आई वडिलांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने अमरावती येथे गुन्हा दाखल केला असून, चिखली पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग झाला आहे. १ जानेवारी २०२१ ते मे २०२१ या दरम्यान मोरवस्ती येथील फिर्यादी राहत असलेल्या घरी हा प्रकार घडला आहे.
















