न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ जाने.) :- धनगर समाज सेवा संघ, पुणे यांच्या वतीने रविवार (दि. ०६) रोजी स. १० ते ५ या वेळेत रहाटणीतील थोपटे लॉंन्स येथे ११ वा राज्यस्तरीय भव्य वधू-वर मेळावा २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे.
वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन जलसंधारण व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री राम शिंदे याच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गणपत देशमुख, रामराव वडकुते, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, नगरसेवक नाना काटे, पिंपरी चिंचवड शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, नगरसेवक, पदाधिकारी व आदी उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यास कार्यकारिणी कार्याध्यक्ष, दिलीप काटकर, सचिव, विजय भोजणे, खजिनदार, अभिमन्यू गाडेकर, उपाध्यक्ष, मच्छिंद्र पिसे, संचालक, गणेश लांबाते, संचालक राजेंद्र कवितके, विठ्ठल कडू, दर्शन गुंड, पांडुरंग उराडे, विजय पिसे, अध्यक्ष, भास्करराव गाडेकर, रमेश सावळकर, रोहिदास गोरे, उपाध्यक्ष, गोविंद वलेकर व आदींचा सहभाग असणार आहे.
वधु-वर मेळाव्यास पुणे जिल्ह्यातील, पिंपरी चिंचवड शहरातील व राज्यातील आठ ते दहा हजार समाजबांधव उपस्थित राहणार असल्याचे, धनगर समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद कुचेकर व शहर कार्याध्यक्ष काळूराम कवितके यांनी सांगितले आहे.















