- गरोदर महिला व परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे या केंद्रावर होणार कोविड लसीकरण.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या शुक्रवारी (दि. ०९) रोजी ‘कोविशिल्ड’चा १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी फक्त पहिला डोस हा १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी स्लॉट बुकींग ओपन होईल.
कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, संजयकाळे सभागृह, साई अंब्रेला, संभाजीनगर दवाखाना, घरकुल दवाखाना चिखली, पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगर, प्राथमिकशाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, नुतन शाळा, ताम्हाणेवस्ती, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल नेहरुनगर उर्दु शाळा, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयनी नगर, भोसरी, सखुबाई गार्डन, भोसरी, सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, मोशी दवाखाना, छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय, दिघी (सी एस एम), पिं.चिं.म.न.पा.शाळा बोपखेल, अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी, आदिशक्ती हॉस्पीटल भोसरी, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, निळु फुले नाटय गृह गणेश इंग्लिश स्कुल, दापोडी खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ पिं. चिं. मनपा शाळा, वाकड पिं. चिं. मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागर नवीन जिजामाता रुग्णालय नताशा आय क्लिनिक, पिंपळे सौदागर काकाज इंटरनॅशनल स्कुल, तापकिर मळा, काळेवाडी फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन मानसरोवरगुरुव्दारा, वाल्हेकरवाडी सेक्टर नं.२९, मोरेश्वर भोंडवे कार्यालयजवळ, रावेत अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड प्रेमलोक पार्क दवाखाना या ३६ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १००, २००, ३००, ४०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने डोस मिळेल.
तसेच उद्या वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे.
या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्याहेगडेवारजलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) इ.एस.आय.एसहॉस्पीटल-मोहननगर, चिंचवड आर.टी.टी.सीसेंटर पिं.चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली भानसेस्कुल, यमुनानगर दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकारामनगर पिंपरी क्वालिटी सर्कल, भोसरी नवीन भोसरी रुग्णालय पंडितज वाहरलाल नेहरु शाळा, च-होली सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी गंगोत्री पार्क, दिघी शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी बालाजीलॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी. आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटेवस्ती कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगांव पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडी पिं.चिं. मनपा. शाळा राहटणी कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड मनपा शाळा किवळे बिजलीनगर दवाखाना कामत हॉस्पीटल पिंपरी नर्सिंग स्कुल, चिंचवड बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे मनपा शाळा, वाल्हेकरवाडी या २५ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत पहिला व दुसरा डोस २००, ३००, ४०० या लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
तसेच ‘कोव्हॉक्सीन’ वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव माध्यमिक शाळा या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत पहिला १०० व दुसरा डोस १०० लाभार्थी क्षमतेने देण्यात येईल.
कोव्हॉक्सीन’ वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क, फुलेनगर या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत पहिला १०० व दुसरा डोस १०० लाभार्थी क्षमतेने देण्यात येईल. वय ४५ वर्षा वरील सर्वलाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल.
गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगररुग्णालय, आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या लसीकरण केंद्रावर ५० लाभार्थीचे डोस राखीव ठेवण्यात येत असून लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation letter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.), मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा-या नागरीकांना ऑफर पत्र तसेच टोकिओ ऑलंपिकमध्ये भाग घेण्यासाठी नामांकन याबाबतचे पत्र असलेले खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना या कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवारी नविन जिजामाता रुग्णालयात पहिला डोस १०० व दुसरा डोस १०० या केंद्रावर ‘कोविशिल्ड’चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी-१०.०० तेसायं- ०५.०० या वेळेत करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर सकाळी ०९.०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.