न्युज पीसीएमसी नेटवर्क : पिंपरी : शिवसंपर्क अभियानाद्वारे खेडोपाडी व गावोगावी शाखानिहाय भेटी देण्याचा उपक्रम शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी राबविला आहे. याकरिता त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, मावळचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे, मावळ विधानसभा संपर्क प्रमुख गणेश जाधव व युवासेना विस्तारक वैभव थोरात यांची भेट घेतली.
या अभियानामार्फत कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर पक्ष संघटन मजबूत करण्याकरीता पक्षाचे काम गावपातळीवर पोहचविण्याचे आवाहन केले आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर सोपवली असून पक्षसंघटनेकरिता आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता केली जाईल असे यावेळी त्यांनी सांगितले.
















