न्युज पीसीएमसी नेटवर्क : चिंचवड : चिंचवडेनगर येथे उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्यावतीने पवना पूल ते चिंचवडे नगर रस्त्याच्या दुभाजका मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रभागातील नागरिकांना वृक्षारोपणाचे महत्व कळावे तसेच पर्यावरण समतोल कसा राखावा याचे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.
या उपक्रमास वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, आरटीओ कार्यालयाचे API उमेश लोंढे, मा. सत्तारूढ पक्षनेते शामराव वाल्हेकर, देहू संस्थान सदस्य अशोक महाराज मोरे, सामजिक कार्यकर्ते गजानन गायकवाड, सोपान चिंचवडे, संजय खंगरे, जेष्ठ नागरिक गजानन भाऊ चिंचवडे, शशिकांत कर्णिक, मधुकर शिरोळे, नानासाहेब मरळ, उद्धव डोके व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
















