- पत्नी, सासू, सासरा व तनिष्कच्या बिल्डर मेहतांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- चऱ्होलीतील तनिष्क सावली सोसायटीत चेअरमन असताना फ्लॅटधारकांकडून बिल्डिंगच्या खाली गाड्यांकरीता पार्किंगची सोय करुन देतो, असे म्हणून प्रत्येकी १ लाख रुपये मागायला लावले. मात्र, बिल्डरने पार्किंगची कोणतीही सुविधा उपलब्ध केली नाही.
घरगुती तसेच पती पत्नीच्या भांडण्याच्या कारणावरुनही तरुणाला त्रास दिला जात होता. याचा मानसिक त्रास घेऊन तरुणाने राहत्या घरी २६ जून रोजी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश विलास शिंदे (वय ३६, रा. तनिष्क सावली सासोयटी, चर्होली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मयताचा भाऊ सुखदेव विलास शिंदे (वय ३५, रा. धनकवडी) यांनी आळंदी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आळंदी पोलिसांनी स्रेहल योगेश शिंदे, विजया चंद्रकांत माने, चेतन चंद्रकांत माने, सुमन किरण माने, किरण महादेव माने, अभिजित किरण माने व तनिष्कचे बिल्डर मेहता यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.












