- अठरा लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२१) :- आरोपीने फिर्यादी यांना भावनिक साद घालून वेळोवेळी घर खर्चासाठी पैशांची मागणी केली. आईचे पेन्शनचे पैसे आल्यावर तसेच अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाल्यावर घेतलेले पैसे परत करते, असे सांगून महिलेने फिर्यादी यांच्याशी जवळीक साधली.
त्यानंतर आरोपीने जास्त रक्कम मागितली. जास्त रक्कम देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपीने बदनामी करून तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. ई मेल व फोन संदेशाद्वारे वारंवार पैशांची मागणी करून तिच्या बँक खात्यावर १८ लाख रुपये घेतले.
याबाबत आयनुद्दीन वीजर पटेल (वय ६२, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी बुधवारी (दि. १४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरती मनोज पांचाळ उर्फ मंगल प्रकाश वाल्मिकी (वय ३४, रा. विकासनगर, किवळे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.












