न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जाने.) :- पिंपरी चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात आंतरराष्टीय लघुचित्रपट ( PCISFF ) महोत्सव दिनांक १६ आणि १७ मार्च २०१९ रोजी होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील चित्रपट प्रेमीं तरुणांना हक्काचे व्यासपीठ पिंपरी चिंचवड फिल्म क्लब च्या वतीने भरवत असलेल्या पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्या निमीत्ताने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व चित्रपट प्रेमींना आंतरराष्टीय दर्जाचे लघुचित्रपट पाहावयास मिळणार आहेत. तसेच या महोत्सवा दरम्यान चित्रपट क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयावर चर्चा होणार असून, चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
अधिक माहितीसाठी http://www.pimprichinchwadisff.com या संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन महोत्सवाचे आयोजक व पिंपरी चिंचवड फिल्म क्लबचे संचालक व डायरेक्टर अविनाश कांबीकर आणि दत्त गुंड यांनी केले आहे.















