- माजी. खा. आढळराव पाटील व सुलभाताई उबाळेंची प्रमुख उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२१) :- शिवसंपर्क अभियानांतर्गत उपनेते तथा माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे यांच्या हस्ते चिखलीतील घरकुल येथे शिवसेना शाखा नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शहरप्रमुख सचिन भोसले, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, शहर संघटक सचिन सानप, उपशहर प्रमुख शैलेश मोरे, अनिल सोमवंशी, सर्जेराव भोसले, प्रदीप सपकाळ व भोसरी विधानसभेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
भोसरी विधानसभा समन्वयक ऋषिकेश जाधव यांनी नियोजन केले. शाखाप्रमुख गोविंद तांबवाडे, किसन शेवते, उपशाखाप्रमुख बापूसाहेब ढेकळे, दत्तात्रेय शिंदे, दयानंद साठे, शिवाजी खराटे, सुनील शिंदे अमोल खंडागळे अमोल काळे, ऋषी सूर्वे, आश्रुबा सारूक, रोहिदास पाटील, नाना घुले आदींनी परिश्रम घेतले.












