- चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२१) :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस साजरा होत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने ऑक्सिजनचे महत्व लक्षात घेत, चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निसर्गाच्या/पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वाढदिवसानिमित्त ” अजित वृक्ष लागवड महाअभियान ” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध प्रजातींची २२००० झाडं व रोपांची खुली मैदाने, मनपा उद्याने, नदी किनारे, टेकड्या आदी ठिकाणी लागवड करण्यात येणार आहे. शहरातील हाऊसिंग सोसायटी, वैयक्तिक बंगले, वैयक्तिक घरे, मोठ्या चाळी, मोठया वसाहती आदी ठिकाणी वृक्षदान करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संदीप चिंचवडे दिली आहे.
हे महाअभियान शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हनुमंतराव गावडे, भाऊसाहेब भोईर, नानासाहेब काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे, संतोष कोकणे, शितल काटे, उषा काळे, अपर्णा डोके, प्रज्ञा खानोलकर, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, कैलास थोपटे, मच्छिंद्र तापकीर, सतीश दरेकर, राजेंद्र साळुके, गोरक्षनाथ लोखंडे, आशा सूर्यवंशी, श्रीधर वाल्हेकर, राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर, सामाजिक न्याय शहराध्यक्ष विनोद कांबळे, विद्यार्थी अध्यक्ष यश दत्ता साने, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, पदवीधर सेल अध्यक्ष माधव पाटील, खानदेश सेल अध्यक्ष दिलीप पाटील, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष युसूफ कुरेशी, बचत गट महासंघ अध्यक्षा शिला भोंडवे, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने पार पडणार आहे.