न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जाने.) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी प्रेमलोक पार्क चिंचवड येथे स्वतंत्र इमारत महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. या इमारतीचे मागील सहा महिन्यांपासून डागडुजीचे काम सुरू होते. एक जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा कारभार या इमारतीमधून सुरू करण्यात आला आहे.
कार्यक्रमास महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, गटनेते राहुल कलाटे, सचिन चिंचवडे, कैलास बारणे आदींसह नगरसेवक-नगरसेविका, महापालिका अधिकारी उपस्थित होते.
महापालिका आणि पदाधिकाऱ्यांनी पुरेसा निधी आणि वेळ देऊन मोठी मदत केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामकाजात सुसूत्रता येईल, असे मत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस आयुक्त पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, विनायक ढाकणे, नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त सतीश पाटील, चंद्रकांत अलसटवार, अश्विनी केदार, गणपत माडगूळकर, निलम जाधव, राम जाधव, श्रीधर जाधव आदींनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.















