- भाजपा बूथ सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२१) :- भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने संपुर्ण शहरात बुथ सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी सोमवार (दि. १९) व मंगळवारी (दि. २०) पिंपरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक २० मधील भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख तथा महत्त्वाचे कार्यकर्ते यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली.
संत तुकाराम नगर, लांडेवाडी, महात्मा फुलेनगर या परिसरात घरोघरी जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पक्षवाढीसाठी चालू असलेले काम याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला. प्रत्येकाने अत्यंत तत्परतेने स्वागत व चहापान केले. कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळत असल्याची भावना गोरखे यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजप नगरसेविका सुजाता पालांडे, भाजपा उपाध्यक्ष तथा बूथ अभियान प्रमुख प्रकाश तात्या जवळकर, चिटणीस देवदत्त लांडे, पिंपरी दापोडी मंडल अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, शक्ती केंद्रप्रमुख शीतल कुंभार, मंगेश घाडगे, विश्वास पारवे, शरण बसवेश्वर शिंगे, पांडुरंग दातीर पाटील, बूथ प्रमुख निलेश अष्टेकर, पंकज वेंगुर्लेकर, अभिषेक पोथरकर, स्वप्नील वाजे आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.