- पालिका आयुक्त व महापौरांनाही दिल्या कानपिचक्या..
- म्हणाले, ‘माझी मतं पिपंरी चिंचवडकरांना स्पष्ट माहित आहेत’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२१) :- ‘गुन्हेगारांना होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का?’ माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरुन आवाहन केलं आहे. जर कोणी काही केलं असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कधीच बंदी घालण्यात आलेली नाही. मी पिपंरी चिंचवडमध्ये आज आलेलो नाही. माझी मतं पिपंरी चिंचवडकरांना स्पष्ट माहित आहेत, असे मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुधवारी (दि. २१) रोजी एका खासगी संस्थेच्या वाहनांच्या वितरण समारंभानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘डिजिटल माध्यमांतून शुभेच्छा द्या’, असे सांगूनही पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावले आहेत. तुमच्या वाढदिवसानिमित्त गुन्हेगारांनीही होर्डिग लावले असल्याचे पत्रकारांकडून विचारण्यात आले.
त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले,” तुम्ही काहीतरी नविन मुद्दा काढण्यासाठी प्रश्न काढायचा हे धंदे बंद करा. अनिधकृत होर्डिंग लावावं हे मी सांगितलं नाही. मी फार नियमांच पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग जर चूकीची लागली असतील तर भाजपाची इथे सत्ता आहे. तिथल्या आयुक्तांनी आणि महापौरांनी कारवाई करावी” असेही अजित पवार म्हणाले.