- शहराध्यक्ष तथा आ. महेशदादांच्या नेतृत्वाखाली चिखलीत शुक्रवारी कोरोना योद्ध्यांचा गौरव…
- युवा नेते पांडाभाऊ साने व नवदुर्गा सखी मंचच्या रुपाली सानेंचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२१) :- : ‘साधेपणा आवडणारे बडेजाव टाळणारे’ भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र, यंदा करोनाचं संकट असल्यानं वाढदिवशी शुभेच्छा बॅनर्स, होर्डिंग्ज व वाढदिवसाला कोणत्याही प्रकारे उत्सवी स्वरुप न देण्याच्या त्यांच्या निर्णयाचे युवा नेते पांडाभाऊ साने व नवदुर्गा सखी मंचच्या संस्थापिका, अध्यक्षा रुपाली साने यांनी स्वागत केले आहे.
कोरोना योद्ध्यांनी संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य चोखपणे बजावले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी, म्हणून वाढदिवसानिमित्त सेवाकार्यात सहभाग घेत, शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक एक चिखली-मोरेवस्तीतील कोरोना योद्धे आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना पावसापासून बचावासाठी पावसाळी रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान नवदुर्गा सखी मंचच्या महिला सदस्यांसाठी मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम चिखली-साने चौक, अंगणवाडी महापालिका शाळेत शुक्रवारी (दि. २३) रोजी दुपारी १२.०० वाजता पार पडणार आहे.
यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, ‘फ’ प्रभाग समिती अध्यक्ष कुंदन गायकवाड, प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते आदी उपस्थित राहणार आहेत. प्रभागातील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून कोरोना योद्ध्यांचे बळ वाढवावे, असे आवाहन युवा नेते पांडाभाऊ साने व नवदुर्गा सखी मंचच्या संस्थापिका, अध्यक्षा रुपाली साने यांनी केले आहे.