- KIOSK टोकन प्रणालीचा उद्यापासून अवलंब..
- तब्बल ७५ ठिकाणी ‘कोविशिल्ड’ व ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा डोस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी (दि. २३) रोजी ‘कोविशिल्ड’ लसीचा फक्त पहिला डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी १०० टक्के कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग ओपन होईल. प्रायोगिक तत्वावर पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं.चिं.म.न.पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेशप्राप्त झालेल्या १० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.
कै. ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगररुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी खिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव नवीन जिजामाता रुग्णालय या सहा लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत केंद्रनिहाय पहिला डोस एकुण लाभार्थी क्षमता १९० लाभार्थी कोविन अॅप ऑनलाईन बुकिंग व १० लाभार्थी KIOSK टोकन प्रणालीव्दारे देण्यात येईल.
‘कोविशिल्ड’लसीचावय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना फक्त पहिला डोस हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखाना पिं.चिं. मनपा. शाळा जाधववाडी रुपीनगर ठाकरे शाळा तळवडे समाज मंदीर शाळा प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती भानसे स्कुल, यमुनानगर आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ मनपा शाळा खराळवाडी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयणी नगर, भोसरी सखुबाई गार्डन, भोसरी निळुफुले नाटयगृह, पिंपळेगुरव शंकुतला शितोळे शाळा, वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी. गणेश इंग्लिश स्कुल, दापोडी पिं.चिं.मनपा शाळा वाकड पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग अण्णासाहेबमगर शाळा,पिंपळे सौदागर नताशा आय क्लिनिक, पिंपळे सौदागर काकाज इंटरनॅशनल स्कुल, तापकिर मळा, काळेवाडी फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन सेक्टर नं.२९, आठवडाबाजाराजवळ, रावेत मानसरोवरगुरुव्दारा, वाल्हेकरवाडी प्रेमलोक पार्क दवाखाना या कोविड-१९ लसीकरण केंद्रावर- ज्यांनी कोविनअॅपवर१०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेले आहे अशांना सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत दोनशे लाभार्थी क्षमतेने देण्यात येईल.
वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या लसीकरण केंद्रावर एकुण २०० लाभार्थीक्षमतेपैकी १९० लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे करण्यात येईल आणि १० लाभार्थींचे पिं पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं.चिं.म.न.पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेशप्राप्त झालेल्या लाभार्थ्यांचे सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल.
वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पध्दतीने देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संजयकाळे सभागृह इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड आर.टी.टी.सी सेंटर घरकुल दवाखाना चिखली पिं.चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली स्केटींग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगर स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामातापार्क, फुलेनगर नुतनशाळा, ताम्हाणेवस्ती नेहरुनगरउर्दु शाळा दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी सावित्रीबाईफुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना छञपतीशाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम) पंडितजवाहरलालनेहरुशाळा, च-होली पिं.चिं.म.न.पा. शाळा बोपखेल सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी क्वालिटीसर्कल, भोसरी नवीन भोसरी रुग्णालय गंगोत्रीपार्क, दिघी कासारवाडी दवाखाना पिंपळे गुरव माध्यमिक शाळा पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकरवस्ती मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती वाकड कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगांव पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडी पिं.चिं. मनपा. शाळा राहटणी कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा मनपा शाळा किवळे बिजलीनगर दवाखाना बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे मनपा शाळा वाल्हेकरवाडी या लसीकरण केंद्रावर दोनशे लाभार्थी क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या स्वामीविवेकानंदबॅडमिंटनहॉल, जिजामातापार्क, फुलेनगर अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० क्षमतेने देण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिं.निलख दवाखान्याजवळ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थी क्षमेतेने देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
तसेच गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरणासाठी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी यमुनानगररुग्णालय आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव नवीन जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे या लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.












