- असे म्हणत, कुदळवाडीत एकाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२१) :- ‘तुमने गाव के इलेक्शन मे हमारा सपोर्ट नही किया, हमारे भाई लोगो का नाम खराब किया’, असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली. जाब विचारला असता आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच लोखंडी पाईपने डोक्यात, पाठीत, आणि हातावर मारून जखमी केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांचा मोबाईल फोडून टाकला. ही घटना १४ जुलै रोजी दुपारी सव्वा पाच वाजता कुदळवाडी, चिखली येथे घडली.
मनीष भगवानदास गुप्ता (वय २६, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी बुधवारी (दि. २१) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनू व मंत्री यादव (रा. कुदळवाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.












