- ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा डोस मिळणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या (दि. २४) रोजी वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना १०० टक्के ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे ‘ कोव्हॉक्सीन’ लसीचा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या १०० लाभार्थ्यांना महापालिकेच्या स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर, अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० क्षमेतेने देण्यात येईल. त्यासाठी सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
तसेच ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षापुढील लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिं.निलख दवाखान्याजवळ या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थी क्षमतेने देण्यात येईल.
वय ४५ वर्षावरील सर्व लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने उद्या या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही.
दरम्यान पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation letter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.), मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा-या नागरीकांना ऑफर पत्र तसेच टोकिओ ऑलंपिकमध्ये भाग घेण्यासाठी नामांकन याबाबतचे पत्र असलेले खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना या कागदपत्रांच्या पुराव्यासह उद्या शनिवारी नविन जिजामाता रुग्णालय या लसीकरण केंद्रावर पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी १०.०० ते सायं ०५.०० या वेळेत २०० लाभार्थी क्षमतेने लसीकरण करण्यात येणार आहे.