- चिखलीतील घटना; अल्पवयीन मुलाचाही सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२१) :- आरोपींनी इतर लोकांच्या जीवाला हानी पोहोचवण्याच्या इराद्याने तसेच पिस्तूलाचा वापर करून दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले. पोलिसांनी म्हेत्रेवस्ती, चिखलीमधील जय मल्हार हाउसिंग सोसायटी येथे सापळा लावला.
त्यांच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. त्यातील एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करीत, इतर चार जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षद कुमार शिंदे (वय २३, रा. शिंदे वस्ती, लोणीकंद), ओमकार उर्फ सोन्या विलास नांगरे (वय २०, रा. आळंदी), अजिंक्य दादासाहेब म्हस्कुटे (वय २३, रा. खामगाव, ता. दौंड), ऋतिक काळूराम शिवले (वय १९, रा. शिंदेआळी, लोणीकंद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.