- शुक्रवारचा पाणीपुरवठा अपुरा व अनियमित; पालिकेची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने रावेत येथील जलउपसा केंद्रातील दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी (२९ जुलै) शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे शहरात गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा होऊ शकेल. सायंकाळी मात्र शहरातील सर्व भागांचा पाणीपुरवठा होणार नाही. दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी (३० जुलै) होणारा पाणीपुरवठा अपुरा व अनियमित स्वरूपाचा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
















