- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात वाहन चोरटयांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. त्यांना रोखण्यासाठी पोलिस आता सरसावले आहेत. गुन्ह्यांच्या तपासासाठी एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक दर्जाचे अधिकारी या पथकाचे प्रमुख असून दहा कर्मचाऱ्यांची या पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे या पथकाचे रिपोर्टीग असणार आहे.
शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या सूचनेनुसार या पथकाची पुन्हा स्थापना करण्यात आली आहे. किचकट गुन्ह्यांचा उलगडा करणे , हा पथक स्थापनेचा मुख्य हेतू आहे . या व्यतिरिक्त आरोपींच्या मोड्स ऑपरेंडीचा अभ्यास करून गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पथक प्रयत्न करणार आहे, अशी माहिती डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा यांनी दिली.
असे आहे वाहन चोरीविरोधी पथक
सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख गुन्हे शाखा युनिट ४, पोलिस हवालदार संदीप गवारी, वाकड पोलिस ठाणे पोलिस हवालदार भीमराव बोरुडे, वाहतूक विभाग पोलिस नाईक प्रमोद हिरळकर – गुन्हे शाखा, युनिट १-पोलिस नाईक विपुल जाधव – गुन्हे शाखा, युनिट २ पोलिस शिपाई जगदीश बुधवंत – गुन्हे शाखा, युनिट- ३ पोलिस नाईक लक्ष्मण आढारी गुन्हे शाखा, युनिट ४ पोलिस नाईक नामदेव वडेकर, वाहतूक विभाग पोलिस शिपाई शामसुंदर गुट्टे – गुन्हे शाखा, युनिट ५० पोलिस नाईक व्ही. आर. नलगे – खंडणीविरोधी पथक पोलिस शिपाई अरुण साबळे वाहतूक विभाग.