- गुंडाविरोधी पोलिसांनी केलं गजाआड; आकुर्डीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२१) :- विनापरवाना पिस्तुल बाळगणाऱ्या व व्हिडिओ करणाऱ्या दोन तरुणांना गुंडा विरोधी पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. व्हिडिओ बनवून तो व्हॉटसपला स्टेट्स म्हणून ठेवला होता.
याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, या दोघांना ते राहत असलेल्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तेव्हा, त्यांच्याकडे पिस्तुल आढळले, तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये पिस्तूलासोबत काढलेले फोटो आणि व्हिडिओ देखील निदर्शनास आले आहेत.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी रामदास कुंडलिक मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. आरशान शकिर शेख वय- २५ आणि उमेर जाकीर शेख वय- २१ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल हस्तगत केले आहे. ही कारवाई आकुर्डी परिसरात करण्यात आली.